1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 9 जून 2024 (22:26 IST)

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या सहा मंत्र्यांचा समावेश

nitin gadkari
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण सहा मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात तीन कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
 
नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रताप जाधव कॅबिनेट मंत्री तर रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्र्यांमध्ये समावेश आहे.
 
नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 
एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत 293 जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपला स्वबळावर 240 जागा मिळवण्यात यश आलं आहे.
 
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश विदेशातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.
 
यावेळी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह शाहरूख खान, रजनिकांत, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अक्षय कुमार यांचाही उपस्थितांमध्ये समावेश आहे.