मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:16 IST)

उद्योगमंत्र्यांचे कोकणातील लोक त्यांच्या उद्योगांबद्दल सांगतात - उदय सामंत

uday samant
विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे. नव्या सरकारच्या काळात एकही नवा उद्योग आला नाही, असा दावा ठाकरे गट, तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केला जातो. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नवे उद्योग आणण्याचे काम केलेले नाही, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. दरम्यान, ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गुंतवणूक आणि नव्या उद्योगांच्या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते  मागाठाणे येथील एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
 
“पुढच्या पिढीला रोजगार हवा असेल, नोकरी हवी असेल तर नव्या उद्योगांची गरज आहे. मात्र मागील सात ते आठ महिन्यांत महाराष्ट्रात एकही उद्योग आलेला नाही. महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तेव्हा साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र आताच्या उद्योगमंत्र्यांचे उद्योग त्यांनाही माहिती नाहीत. मात्र कोकणात जाऊन सभेत विचारलं तर कोकणातील लोक त्यांच्या उद्योगांबद्दल सांगतात,” अशी टीका अदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर केली.