1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (07:29 IST)

मफतलाल येथील भूखंडाखाली मत्स्यालय बांधण्याबाबत चाचपणी

मुंबई महापालिकेला मफतलालकडून प्राप्त झालेल्या भूखंडाखाली ‘भूमिगत मत्स्यालय’ बांधण्याबाबत संभाव्यता तपासण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री व मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात मुंबईतील विविध कामांबाबत बुधवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी सदर माहिती दिली. या बैठकीस आमदार सदा सरवणकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह विविध परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
 
मुंबईतील नागरिकांच्या समस्यांचे शासन आणि प्रशासन यंत्रणेने स्वतःहून निराकरण केल्यास शासन आणि प्रशासनाला नागरी समस्यांची जाणीव आहे, ही सकारात्मक भावना नागरिकांमध्ये विकसित होईल, अशी भावनाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.