शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (15:32 IST)

इर्शाळवाडी: 36 तासांनी महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं

landslide in raigad irshawadi village
दैव तारी त्याला कोण मारी हे आज सिद्ध झाले आहे रायगडच्या इर्शाळवाडीत.रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 103 जणांना शोधण्यात यश आलं आहे. अजून 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच NDRF ची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून आणखी इतर यंत्रणा इथं दाखल झाल्या आहेत.
 
इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तिथं मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात बचाव पथकाने एका महिलेला तब्बल 36 तासानंतर जिवंत काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
ही  महिला ढिगाऱ्याच्या खाली अडकली असून तिला वाचविण्यात यश आले असून तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. 
 
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 119 लोकांची ओळख पटली आहे. अजून 109 लोकांचा शोध सुरू आहे. मृता 16 लोकांपैकी 12 जणांची ओळख पटली असून अद्याप 4 जणांची ओळख पटलेली नाही.5 लोक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्यामुळे रात्री बचावकार्य थांवण्यात आलं होतं. आज (21 जुलै) सकाळपासून बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.


Edited by - Priya Dixit