शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:50 IST)

अखेर ठरले..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या औरंगाबाद येथील बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही बैठक अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या उपस्थित घेण्यात आली.
 
ठाले-पाटील यांना भेटण्यासाठी ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर,साहित्य संमेलनाचे समन्वयक विश्वास ठाकूर,संमेलनाचे कार्यवाह प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे,संजय करंजकर,सुभाष पाटील,संमेलनाचे साहित्य दिंडीचे प्रमुख विनायक रानडे गेले आहेत.
 
त्यांच्यासह महामंडळाचे कार्यवाहक डॉ दादा गोरे, खजिनदार डॉ रामचंद्र काळुंगे आणि स्थानिक कार्यकर्ते निलेश राऊत यांचे उपस्थितीत बैठक झाली.त्यात निर्णय घेण्यात आला.ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून महामंडळ आणि साहित्य संमेलनाचे संयोजकांची बैठक झाली.