गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (10:49 IST)

Jalgaon:कारने चौघांना चिरडले, दोघांचा दुर्देवी मृत्यू, दोघे जखमी

accident
जळगावच्या पाचोरा तालुक्यात गोराडखेडा येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने चौघांना चिरडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात एका 16 वर्षीय विद्यार्थिनींसह 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. सुभाष पाटील आणि दुर्वा पाटील असे दोघे मृत्युमुखी झाले आहे.  परशुराम पाटील आणि ऋतुजा भोईटे असे जखमी झाले आहे.जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

सदर घटना गुरुवार सायंकाळची आहे. सहावाजेच्या सुमारास पाचोऱ्याकडून जळगावच्या दिशेने जाणारी वेगाने धावणारी कारने चौघांना चिरडले आणि नंतर कार पालटली. त्यात दोघेजण जागीच मरण पावले तर दोघे गंभीर जखमी झाले. 

धडक एवढी जोरदार होती की काही जण उडून जवळच्या शेतात पडले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून कार मधील तरुणांना अटक केली आहे. या अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे तर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले आहे. 

 Edited by - Priya Dixit