जळगाव : मुलीने फडणवीसांना लावला पायाने टिळा, फडणवीस भावुक झाले
Photo - Devendra fadanavisTwitter
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जळगावमधील दिव्यांग शाळेत भेट दिली. या वेळी त्यांना एका दिव्यांग मुलीने पायानं टिळा लावला. आणि पायानं ताट धरून औक्षण केले. या वेळी फडणवीस भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे. आजवर मला किती माता भगिनींनी ओवाळले आहे. कपाळी आशीर्वादरूपी टिळा लावला आहे पण आज माझा कपाळी टिळा लावला पण हाताने नव्हे तर पायाने हे बघून माझं मन भरून आलं. हे करताना दिव्यांग भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य होत.
तिच्या नजरेची चमक जणू नियतीला आव्हान देत असून म्हणत आहे '' मला कोणाची सहानुभूती नको. द्या नको, मी खंबीर आहे. तिला पाहून मी एवढंच म्हणालो ,ताई तू लढत राहा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.
या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
Edited by - Priya Dixit