सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (15:21 IST)

Jalana:जालनाच्या मुलीची उंच भरारी,परदेशातून साडेतीन कोटींची ऑफर

Shital Jumbad
Photo - Shital Jumbad X
आज एकविसाव्या शतकात मुले-मुली खांद्याला खांदा लावून चालत आहेत, अशी एक म्हण आहे. आज मुली मुलांपेक्षा कमी नाही. जालन्यातील शीतल जुंबड ही एका शिक्षकाची मुलगी आहे. ज्यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले आणि आता परदेशातून कोट्यवधींचे पॅकेज मिळत आहे.तिला अमेरिकेतून वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करणार असून तिने पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक केले आहे. तिच्या बायोडाटामध्ये कुठेही आयआयटी किंवा एनआयटी असे लिहिलेले नाही. तरीही तिला परदेशातून 3.5 कोटी रुपयांचं मोठं पेकेज मिळालं आहे. 
 
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाबा साहेब जुंबड यांची कन्या शीतल हिने कुटुंबाचाच नव्हे तर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विक्रम मोडीत काढला आहे. शीतलने बाल विकास प्राथमिक विद्यालय, जालना येथून पहिली ते चौथीपर्यंतचे, सरस्वती भुवन हायस्कूलमधून पाचवी, परतूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातून सहावी ते दहावी, इंदेवाडी येथील विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयातून 11वी आणि 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
 
शीतलने पुण्याच्या (VIT)विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज मधून बीटेकचे शिक्षण घेतले असून 
विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी आवश्यक असलेल्या GRE आणि TOEFL या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिने सहायक प्राध्यापक म्हणून काम केले आणि अमेरिकेतून मास्टर्स केले.दरम्यान तिने कॉम्प्युटर मध्ये पीजी केलं.   अलीकडेच कॅलिफोर्नियामध्ये वरिष्ठ सिस्टीम सॉफ्टवेअर अभियंता म्हणून रुजू झाली.
 
GRE आणि TOEFL  या परीक्षेत तिला यश मिळाल्यावर तिला युएसएच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ उटाहमध्ये प्रवेश मिळाला. या उच्च पदवीच्या दुसऱ्या वर्षात त्यांची सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून निवड झाली. यासाठी त्यांना 3 कोटी 60 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.ती इतर मुलींसाठी आदर्श आहे. तिच्यावर तिच्या पालकांना मोठा अभिमान आहे.   
 
 Edited by - Priya Dixit