Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जसलोक हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरने लाँच केले नवीन अत्याधुनिक आयसीयु युनिट

Updated: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (12:45 IST)
 
मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने गुरुवारी ३७-बेड असलेले अत्याधुनि आयसीयू, मल्टि पॅरा मॉनिटर्स आणि व्हेंटिलेटर लॉन्च केले. आयसीयूचे उद्घाटन मुख्य पाहुण्या श्रीमती. अमृता फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, आयसीयू संपूर्ण दोन मजल्यांवर पसरले आहे, आईसीयूमधील रुग्णाची निर्बाध काळजी घेण्यासाठी रोगग्रस्त रुग्ण विभाग, उपचार क्षेत्र, नर्सिंग विभाग, शिकवण्याचे आणि शिकण्याचे असे विभाग डिझाइन केलेले आहे. त्याचसोबत एक्स-रे, यूएसजी, २ डी इको आणि सेंट्रल लाइन प्रक्रिया यासारख्या विविध उपकरणे रुग्णाच्या बेड साइडवर चालवता येऊ शकतात. सर्व गंभीर रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स याना सक्षम केले आहे. आयसीयूमध्ये डायलिसिस सुविधा देखील उपलब्ध असेल.
 
जसलोक हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हरियान यांनी सांगितले की, "आईसीयू युनिटच्या उदघाटनाचा एक भाग म्हणून अमृता फडणवीस यांचे मी आभार मानतो, कारण त्या नेहमीच सामाजिक कार्याची जागृती करत असतात. जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर, हॉस्पिटल रुग्ण केंद्रित आणि करुणामय दृष्टीकोनासह उत्कृष्ट क्लिनिकल केअर साठी प्रसिद्ध आहे. जसलोक मधील सर्व प्रकारच्या रुग्णांना जाती व पंथ बाजूला ठेवून समान सेवा प्रदान केल्या जातात. आयसीयू उदघाटनाच्या मदतीने रुग्णालयाने पुढाकार घेऊन उच्च पातळीवर रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे."
 
सामाजिक कार्यकर्त्या सौ. अमृता फडणवीस  म्हणाल्या कि, "या आयसीयूच्या उदघाटनाचा एक भाग म्हणून मला आनंद वाटत आहे. जसलोक हॉस्पिटल विविध सेलिब्रिटीजवर उपचार करते, त्याचबरोबर दुसरीकडे मला याचा आनंद आहे की, उपचारांसाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णावर उपचार झाल्याशिवाय तो परत जात नाही. देशामध्ये समृद्धी आणि विकास आणण्याच्या प्रयत्नातून दारिद्र्यरेषेच्या खाली असलेल्या लोकांवर सुद्धा उपचार केले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे. मानवतेच्या दृष्टीने हॉस्पिटल नेहमी आपल्या सुविधा सुधारीत असल्याने हॉस्पिटलचे आभारी आहे. "  
 
तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, आयसीयूमध्ये सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आणि उपचार करणाऱ्या प्रतिष्ठित टीम, २४ बाय ७ कार्यरत असते. कर्तव्य निर्धारित निपुणता, नर्सिंग, विशेषज्ञ, फिजियोथेरेपिस्ट, श्वसन तंत्रज्ञ, सल्लागार यासारख्या प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण टीमचा समावेश असेल. यामध्ये इन्फेक्टेड आणि नॉन इन्फेक्टेड रुग्णांसाठी वेगवेगळे युनिट असतील ज्यामुळे विशिष्ट गंभीर रुग्णांवर काळजीपूर्वक लक्ष देण्यास मदत होईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments