1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (21:20 IST)

खेड बायपास झाला खुला, पुणे-नाशिक प्रवासाचा अर्ध्या तास झाला कमी

  expressway
नाशिक : प्रतिनिधी 
पुणे-नाशिक किंवा नाशिक-पुणे या प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. मात्र, आता खेड (राजगुरुनगर) येथील बायपास खुला झाला आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या तास कमी झाला आहे. 
 
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने खेड (राजगुरुनगर) येथील बायपास वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा बायपास दोन जिल्ह्यांना (पुणे आणि अहमदनगर) जोडणाऱ्या महामार्गालगतचा आहे. एकूण ४.९ किलोमीटर लांबीला हा बायपास आहे. या बायपासमुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ रस्त्याने किमान ३० मिनिटांनी कमी होणे अपेक्षित आहे.
 
पुणे ते नाशिक दरम्यानचे २१२ किमीचे अंतर साधारणपणे ४.५ तासांत कापले जाते. आणि काहीवेळा हे अंतर कापण्यासाठी तब्बल ६ तासही लागतात. त्याचे मुख्य कारण आहे ते खेड शहरातून जाणारा अरुंद मालवाहतूक मार्ग. याच रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे. महामार्गालगत राज्य बस वाहतूकही आहे. यामुळे वाहतुकीची अनेकदा प्रचंड कोंडी होते. या महामार्गावरुन जाणारी अवजड वाहने आणखीनच समस्या वाढवतात. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनांना अतिरिक्त ३० ते ४५ मिनिटे लागतात. अनेकदा सर्वाधिक रहदारीच्या वेळेत अवघ्या ५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात किमान १० पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. 
 
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२० मध्ये खेड बायपासचे बांधकाम सुरू केले होते. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता या बायपास खुला झाला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor