शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (10:17 IST)

नॉयलॉन दोरा, निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

मकर संक्रांतीनिमित्त नाशिक शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा(दोरा) निर्मिती, विक्री व वापरावर अनेक ठिकाणी जिल्हयात बंदी घालण्यात आली आहे. मांजा नॉयलॉन स्वरुपात येत असल्याने त्यापासून वन्य पक्ष्यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊन जखमी/मृत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून नाशिक शहरात खबरदारीचा उपाय म्हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) नुसार नॉयलॉन दोरा,निर्मिती,विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता-1960 या कायद्याच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.