शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 10 जानेवारी 2017 (12:10 IST)

वडाळ्यात रंगली द स्पोर्ट्स गुरूकुल आयोजित 'आय काईट' पतंगस्पर्धा

द स्पोर्ट्स गुरूकुल आयोजित आय़ काईट फेस्टिव्हल रविवारी मुंबईतील वडाळ्यात अजमेरा आयलंड इथे आयोजित करण्यात आला होता. आय काईट फेस्टिव्हलच्या माध्यमातून पतंगप्रेमींना पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्याची संधी मिळाली. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा निरनिराळ्या आकाराचे, मुखवट्यांच्या आकाराचे, एलईडीचे असे विविध प्रकारचे पतंग पाहायला मिळाले. निरभ्र आकाशात रंगीबेरंगी पतंगाच्या आकृत्या उमटल्या होत्या. नेहमीप्रमाणे हजारो पतंगप्रेमींनी इथे उपस्थिती लावली. आकाशामध्ये फिरतानाचा क्षण हजारो पतंगप्रेमींनी डोळ्यांत साठविला.लहान मुलांनीही पतंग उडवण्याचा यावेळी मनमुराद आनंद लुटला. बच्चे कंपनी तर पतंगांच्या दुनियेत अक्षरशः हरवून गेली होती. फेस्टिव्हलमध्ये सहकुटुंब आनंद घेणा-यांची संख्या अधिक होती. 
यंदा या फेस्टिव्हलचे तिसरे वर्ष होते. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजामुळे उडणाऱ्या पक्ष्यांना तसेच दुचाकी वाहनधारक व पादचाऱ्यांना होणारा धोका लक्षात घेऊन फेस्टिव्हलमध्ये नायलॉनचे मांजे वापरले गेले नव्हते. यशिवाय या फेस्टिव्हलमध्ये उत्तम डिझाईनर पतंगही पाहायला मिळाल्या. शिवाय बच्चेकंपनीसाठी वेगवेगळे गेम्सही आयोजित करण्यात आले होते.