सोमवार, 19 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (14:00 IST)

सर्पमित्राला (कोब्राला) किस करुन फोटो काढणे जिवावर बेतले

kobra
नवी मुंबईतील सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्राला कोब्राला किस करुन फोटो काढणं  जिवावर बेतलं आहे. बदलापूरचा रहिवास असलेला सोमनाथ म्हात्रेचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. सीबीडी बेलापूरमध्ये एका कारमध्ये साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमनाथ तिथे गेला. सापाला वाचवल्यानंतर सोमनाथ कोब्राला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. तिथे त्याने कोब्राच्या डोक्याला किस करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक कोब्रा सोमनाथच्या छातीला चावला.यानंतर सोमनाथला उपचारांसाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर पाच दिवस उपचार सुरु होते. मात्र 2 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. सोमनाथने आतापर्यंत 100 हून अधिक सापांना वाचवलं आहे. सापाच्या दंशाने मृत्यू होण्याची 12 वर्षातली ही 31वी घटना आहे.