मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पश्चिमी महाराष्ट्रात पूरस्थिती, 1.32 लाख लोकं प्रभावित, शाळा-कॉलेज बंद (बघा फोटो)

पुणे- पश्चिमी महाराष्ट्रात विशेष करुन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती भयावह झाल्यानंतर 1.32 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थानांवर हालवण्यात आले आहे. येथे सतत मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
अधिकार्‍यांनी सांगितले की मागील सात दिवसात पाऊस आणि पूरामुळे विभिन्न घटनांमध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुण्याचे प्रखण्ड आयुक्त डॉक्टर दीपक महाइसेकर यांनी म्हटले की 'पुणे क्षेत्रात (पुणे, सातारा, सोलापुर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात) आतापर्यंत पुरामुळे 1.32 लाख लोकं प्रभावित झाले आणि त्यांना सुरक्षित जागेवर पोहवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात क्रमश: 53,000 आणि 51,000 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.'
महाइसेकर यांनी म्हटले की, 'सेना, नौसेना आणि राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) चं दोन्ही जिल्ह्यात बचाव अभियान सुरु आहे आणि बुधवार संध्याकाळापर्यंत एनडीआरएफच्या सहा आणि आणखी टीम कोल्हापूरला जाणार.'
त्यांनी सांगितले की सर्व क्षेत्रांमध्ये धरणांच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी आहे आणि हवामान खात्याने पुढील चार दिवस सतत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. म्हणून संबंधित धरण क्षेत्रात अधिक पावस पडल्यास पूरस्थिती निर्माण होण्यापासून बचाव अवघड आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका बैठकीत पूरस्थितीची समीक्षा केली. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला धरणातून पाणी सोडणे आणि इतर प्रकल्पांबद्दल रेल्वेसह दररोज माहिती देण्यास सांगितले आहे.