मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (15:11 IST)

कोकण रेल्वे 24 मार्चनंतर विजेवर धावणार

कोकण रेल्वे 24 मार्चनंतर विजेवर धावणार आहे. रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यातील चाचणी 22 आणि 24 मार्चला होणार आहे. त्यानंतर लवकरच कोकण रेल्वेवर सगळ्या गाड्या विजेच्या इंजिनवर धावतील. 
 
गेल्याच महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची चाचणी झाली. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्यामुळे सध्या रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे. तसेच रेल्वे गाड्या विजेवर धावल्यामुळे डिझेलवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच धुरामुळे होणारे प्रदूषण आता होणार नाही.