1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: म्हैसाळ , गुरूवार, 27 जुलै 2023 (22:31 IST)

Krishnas level went up to 34 feet कृष्णेची पातळी गेली ३४ फुटावर

river
गेल्या ७-८‌ दिवसापासून सलग पाऊस होत असल्याने व कोयना अन्य धरणातुन पाणी सोडण्यात आलेने कृष्णा नदीच्या ‌पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोरडी पडलेली कृष्णा नदी आता तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे म्हैसाळ ‌बंधारा गेल्याच आठवड्यात पाण्याखाली गेला आहे.वाढत्या पावसाने ‌व सोडलेल्या पाण्यामुळे गुरूवारी कृष्णेची पातळी म्हैसाळ येथे गुरुवारी दुपारी ३४ फुटावर गेली होती. अद्याप ही कृष्णेचे पाणी पात्रात असुन असाच सलग जर ४-५दिवसात पाऊस लागल्यास कृष्णेचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.दरम्यान, या ठिकाणी असणारा म्हैसाळ प्रकल्प सुरू च असल्याने मिरज पूर्व भागातील शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे.या मुळे कृष्णेच्या वाहुन जाणाऱ्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.