1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 मे 2025 (14:48 IST)

लाडक्या बहिणींचा एप्रिल-मे महिन्याच्या हफ्ता एकदम 3000 मिळणार?

Ladki Bhahin Yojana
लाडक्या बहिणींना अद्याप एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळालेला नाही. बहिणी एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची वाट बघत आहे. बहिणींना एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार याची वाट बहिणी बघत आहे.  मे महिन्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
या दोन महिन्याचा हफ्ता कधी मिळणार या बाबतची घोषणा आदिती तटकरे लवकर करणार आहे. ज्या प्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता एकत्र देण्यात आला होता. त्याच प्रमाणे एप्रिल आणि मे महिन्याचा हफ्ता मे मध्ये मिळण्याची शक्यता आहे. अद्याप या बाबतची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. 
लाडकी बहीण योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार असून कोणत्या तारखेला बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होणार हे लवकरच आदिती तटकरे घोषणा करणार आहे. 
या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी येणार होते. मात्र पैसे जमा झालेले नाही. आता मे महिन्यात तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याची वाट लाडक्या बहिणी बघत आहे. 
 Edited By - Priya Dixit