शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लालबागच्या राजाचे प्रथम मुखदर्शन

lalbaugcha raja 2017
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे सोमवारी प्रथम मुखदर्शन झाले. दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपात लक्षवेधी आणि भव्य आरास करण्यात आली आहे. लालबागच्या राजाची गणेशमूर्ती ही दरवर्षी सारखीच असून सिंहासनावर चक्क कासवाची आरास करण्यात आली आहे. सिंहासनामध्ये दरवर्षी बदल करण्यात येत असतात. गतवर्षी बाप्पांच्या प्रभावळीवर घुबडाला स्थान देण्यात आले होते. 
 
गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या सिंहासनाची सजावट कशी असेल, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असते. आराशीमध्ये बाप्पांच्या प्रभावळीवर पूर्णपणे कासवाचे चित्र आहे. तर आसनाच्या चारही खुरांवरही कासवांच्या मूर्ती आहेत.
उल्लेखनीय आहे की दरवर्षी गणेशोत्सवदरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात.