Dharma Sangrah
✕

लातूर: अंगणवाडी सेविका, मदतनिस होणार बडतर्फ

Updated: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (09:28 IST)

अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करावी व इतर मागण्यांसाठी अंगणवाडीचे कर्मचारी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत. अंगणवाडीतील बालकांचे शिक्षण व पोषण आहाराचा विषय गंभीर बनला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील २ हजार ३२४ अंगणवाड्या गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना कामावर उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बाजावल्या होत्या. त्या नंतर काही अंगणवाडी सेविका व मदतनिस कामावर परतल्या आहेत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात अंगणवाडया बंद आहेत. यामुळे बंद अंगणवाड्यांच्या कर्मचा-यांना शेवटची नोटीस देऊन बुधवारपासून अंगणवाड्या न उघडल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची करवाई होणार आहे.
 
जिल्ह्यातील २ हजार ३२४ अंगणवाड्यांत ३ ते ६ या वयोगटातील ६३ हजार बालके पूर्व शालेय शिक्षण घेतात. या बालकांना खिचडी, गोड लापशी असा या अंगणवाडीमध्ये पोषण आहार नियमित दिला जातो. अंगणवाडीतील पूर्व शालेय शिक्षणातून व पोषण आहारातून विद्यार्थ्यांची शारीरिक व बौध्दिक वाढ होत असते मात्र गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या विकासाचा हा पाया ढासळला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे शहरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूविरोधात मोठी कारवाई

घरकामाचा ताण संपला! संपूर्ण घरात झाडू-पोछा करेल हायरचा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर; जाणून घ्या खासियत

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

स्विम सूटवर 'ॐ' प्रिंट असलेला कपडा लपेटल्यावरून केंडल जेनरवर टीका; सोशल मीडियावर संताप व्यक्त

शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे यांनी बैठक मध्येच सोडली

पुढील लेख
Show comments