बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2016 (10:11 IST)

आता नऊ वॅटचे एलईडी बल्ब देण्याची योजना लागू

राज्यात आता  नऊ वॅटचे एलईडी बल्ब देण्याची योजना लागू झाली आहे. पुण्यात योजनेला सुरुवात झाली असून, विदर्भातील सुरुवात अकोल्यातून होणार आहे. यात नऊ वॅट एलईडी दिवे केवळ ६५ रुपयांत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेंतर्गत राज्यात सातऐवजी नऊ वॅटचे बल्ब देण्याची योजना लागू झाली आहे.