शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:26 IST)

ट्रेनमधल्या मारामारीत महिलेचा चावा

Marathi news
मुंबईतल्या ट्रेनमधली मारामारी काही नविन नाही. यावेळी मात्र लोकलमध्ये दरवाजावर उभे राहण्यावरुन महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यात तीन महिलांनी एका महिलेला मारहाण करत तिच्या हाताला चावाही घेतला. यात प्रभा प्रभुदेवा  नालासोपारा स्टेशनवरुन सकाळी 7.31च्या चर्चगेट लोकलमध्ये चढली. यावेळी ही मारामारी झाली. पुढे तिन्ही महिलांना भाईंदर स्टेशनवर उतरवून  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर प्रभा प्रभुदेवा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.