शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (20:40 IST)

31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार- राजेश टोपे

राज्यात लॉक डाऊन चा सकारात्मक परिणाम दिसत आहे त्या मुळे आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत लॉक डाऊन पुढे वाढवावं अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. लॉक डाऊन 31 मे पर्यन्त वाढविण्याची मागणी सर्व मंत्रींनी केली आहे परंतु  या बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि तसे जाहीर ही करतील .असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.झालेल्या बैठकी नंतर राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधून ते म्हणाले की सध्या 18 ते 44 वर्षाच्या लोकांची लसीकरण रद्द करण्यात आली आहे लसींच्या तुटवड्या मुळे राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असं ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच येत्या दोन दिवसात लॉक डाऊन बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल असं ही ते म्हणाले.