रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (10:11 IST)

प्रेयसीने जिवंत जाळलेल्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन दिनी मृत्यू

प्रेयसीने कुटुंबाच्या मदतीने जिवंत जाळलेल्या प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर गोरख बच्छाव याच्या अंगावर पेट्रोल टाकून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत जाळले होते. शुक्रवारी नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेर गावात हा प्रकार घडला होता. 
 
या घटनेनंतर गोरखवर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्याला मृत्यूने गाठले. या घटनेत त्याची 80 टक्के भाजल्याची माहिती समोर आली होती.  
 
सात वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर ब्रेक अप झाला आणि नंतर अन्यत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने हे टोकाचं पाऊल उचललं. देवळा पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणेसह तिची आई, वडील सात वर्षांच्या प्रेम संबंधांनंतर ब्रेक अप केले आणि अन्यत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या रागातून गर्लफ्रेण्डने कुटुंबाच्या साथीने आपल्या बॉयफ्रेण्डला जिवंत जाळल्याचा आरोप आहे.
 
आरोपी युवती आणि मयत तरुणाचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले होते आणि नंतर मुलीचे दुसरीकडे लग्न देखील ठरले होते. परंतु वरपक्षाने नंतर ते लग्न मोडले. अशात तरुणानेच ठरलेले लग्न मोडले या संशयावरुन प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांनी मुलाच्या गावात जाऊन त्याला जाब विचारला. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
 
पोलिसांनी युवतीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.