Dharma Sangrah

मित्राने प्रेमाने मिठी मारली, डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या

मंगळवार, 21 मार्च 2017 (11:40 IST)
मित्राने प्रेमापोटी मारलेल्या मिठीमुळे मुंबईतील एका डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. डॉ. मधुकर गायकवाड असं या डॉक्टरांचं नाव आहे. ते मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत. धुळ्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी डॉ. अमित बडवे आले होते. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर डॉ. बडवे यांनी डॉ. मधुकर गायकवाड यांना भेटण्याचा विचार केला.डॉ. मधुकर गायकवाड आणि डॉ. अमित बडवे यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली. यावेळी डॉ. बडवे यांनी उत्साहाच्या भरात मारलेल्या मिठीमुळे डॉ. गायकवाड यांच्या तीन बरगड्या मोडल्या.
 
या दोन्ही डॉक्टर मित्रांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. डॉ. बडवे यांना बॉडीबिल्डिंगची अतिशय आवड असल्याचं सगळ्यांना माहित होतं. 1990 मध्ये एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर डॉ. गायकवाड यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात नोकरी मिळाली. तर डॉक्टर बडवे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रॅक्टिसला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघांची भेट झाली नव्हती.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

LIVE: भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या भव्य स्वागतासाठी सहा लाख वारकरी दाखल

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी आरोपीला अटक

महाराष्ट्र विधानसभेत भेसळ करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेच्या मागणीवर मंत्री नरहरी झिरवाल यांचे स्पष्टीकरण

भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments