मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 2 डिसेंबर 2024 (21:50 IST)

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Maharashtra
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्याबाबत महाराष्ट्रात सुरू असलेला सस्पेन्स आता संपणार आहे. तसेच आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

शपथविधीपूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर नागपुरात लावण्यात आले असून, महायुतीला मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करता आलेले नाही. तसेच माहिती समोर येत आहे की, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि मंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सविस्तर वाचा 

नव्या मुख्यमंत्र्याबाबत महाराष्ट्रात सुरू असलेला सस्पेन्स आता संपणार आहे. तसेच आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. आज पक्ष महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षकाच्या नावाची घोषणा करू शकतो. सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्रातील पुण्यामधील न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्यास सांगितले असून हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे नातू यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यासाठी राहुल गांधींना आज पुणे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. तसेच याआधीही नोव्हेंबरमध्ये राहुल गांधींना या प्रकरणी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले होते, पण ते कोर्टात हजर झाले नाहीत. सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असून, त्यासाठी आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आज 10 दिवस पूर्ण होत आहे, पण अजून मुख्यमंत्र्यांचा निर्णय झालेला नाही. रविवारी मुख्यमंत्र्यांची बैठक शक्य नसल्याने सोमवारीच निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले. सविस्तर वाचा 
 

एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेले होते. दोन दिवस साताऱ्यात राहून सस्पेंस निर्माण केल्यानंतर महाराष्ट्राचे कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मुंबईत परतले. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये विजय मिळवूनही महायुतीचे सरकार अजून स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार? याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. पण, भाजप हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस का पुढे आहे? सविस्तर वाचा 

शिवसेना शिंदे गटाचे शिक्रापूर तालुका संघटकचे नेते व शिक्रापूरचे माजी सरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले यांचा यांचा धारदार हत्याराने निघृण खून करण्यात आला
सविस्तर वाचा ...
मुबंईत दुचाकीवरून जात असलेल्या पती पत्नी आणि मुलीला ट्रक ने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आणि पतीला देखील किरकोळ दुखापत झाली आहे.तर 2 वर्षाची मुलगी सुदैवाने सुखरूप बचावली.
सविस्तर वाचा ..

भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पर्यवेक्षक बनवले आहे. दोघेही मंगळवारी मुंबईला जाणार असून विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत बोलणार आहेत.
 

महायुती सरकारच्या शपथविधी समारंभाच्या पूर्वसंध्येला बुधवार, 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाईल, असे भाजपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय जनता पक्षाने विधिमंडळ पक्षनेता निवडल्यानंतर हा निर्णय होईल