शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2026 (11:50 IST)

Maharashtra IAS Transfer महाराष्ट्रात मोठा IAS बदल; प्रशासनात मोठी फेरबदल

மாஸ்க் அணியாத நபரிடம் ஜாதி பெயரை கேட்ட காவலர் மீது நடவடிக்கை!
Maharashtra IAS Transfer महाराष्ट्र शासनाने राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करत, एकाच वेळी १० वरिष्ठ 'आयएएस' (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली यादीत वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश असून, ही त्यांची २४ वी बदली ठरली आहे. २१ वर्षांच्या सेवाकाळात इतक्या वारंवार बदल्या होत असल्याने, प्रशासकीय वर्तुळात ते चर्चेचा एक प्रमुख विषय बनले आहेत. वित्त विभागातही एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
 
यापूर्वी 'महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड' (महावितरण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) असलेले लोकेश चंद्र यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात 'अपर मुख्य सचिव' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले लोकेश चंद्र हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पसंतीस उतरलेल्या अधिकाऱ्यांमध्ये गणले जातात. कृषी आणि पशुसंवर्धन विभागात 'अपर मुख्य सचिव' म्हणून कार्यरत असलेले विकास चंद्र रस्तोगी (IAS: १९९५) यांची आता वित्त विभागात 'अपर मुख्य सचिव' (वित्तीय सुधारणा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागातून बदली करण्यात आलेल्या विनिता वैद्य सिंघल (IAS: १९९६) यांची आता मृद व जलसंधारण विभागाच्या 'प्रधान सचिव' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी विभागात, परिमल सिंह (IAS: २००४) यांची 'सचिव' (कृषी) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, लहू माळी (IAS: २००९) हे 'शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील. यापूर्वी राज्य कर विभागात 'सह आयुक्त' म्हणून कार्यरत असलेल्या प्रेरणा देशभ्रतार (IAS: २०१०) यांची आता मत्स्यव्यवसाय विभागाच्या 'आयुक्त' पदी नियुक्ती करण्यात आली आहे; तसेच, यापूर्वी पुणे महानगरपालिकेचे 'अपर आयुक्त' असलेले पृथ्वीराज बी.पी. (IAS: २०१४) यांची आता वसई-विरार महानगरपालिकेचे 'आयुक्त' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या
अ.क्र. अधिकारी (बॅच) मागील पद नवीन पद
1 लोकेश चंद्र (IAS 1993) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मुंबई
2 अश्विनी भिडे (IAS 1995) मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
3 विकास चंद्र रस्तोगी (IAS 1995) अपर मुख्य सचिव (कृषी) अपर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग
4 विनीता वैद्य सिंघल (IAS 1996) प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग
5 परिमल सिंह (IAS 2004) प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
6 तुकाराम मुंढे (IAS 2005) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग
7 लाहू माळी (IAS 2009) व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि., मुंबई
8 माणिक गुरसळ (IAS 2009) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
9 प्रेरणा देशभ्रतार (IAS 2010) सह आयुक्त, राज्य कर विभाग, मुंबई आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई
10 पृथ्वीराज बी.पी. (IAS 2014) अपर आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका