मेटेना हटाव वर मराठा संघटना सरसावल्या
मराठा समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींनीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या संघटनांनी शिवस्मारक समितीचं पुनर्गठन करण्याची मागणी केली. तर यातील असलेले अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर मराठा समाजाने आक्षेप घेतला असून त्याना हटवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मेटे यांनी कोणतेही काम केलं नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तर शिव स्मारक होत असताना आमचे कोणतेही ऐकून घेतले नाही असाही आरोप त्यंनी केला आहे. मेटेंची कार्यपद्धत मान्य नसल्याचंही मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींतर्फे सांगण्यात आल आहे. एकूण 43 मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे आता तर विनायक मेटे यांची उचलबांगडी होणार हे निश्चित झाले आहे.फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात या कडे मराठा समाजाचे लक्ष लागेल आहे.