महाराष्ट्र पोलीस भरतीची लेखी परीक्षा 23 जुलै रोजी
महाराष्ट्र पोलीस भरतीची लेखी परीक्षा 23 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुरु होईल.उशिरा येणाऱ्या उमेदवारांना 11 वाजे नंतर प्रवेश मिळणार नाही.
या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर वस्तू बॅग इत्यादी आणू नये.
परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
सशस्त्र पोलीस शिपाई भरती-2021 शारीरिक चाचणी मधील 2562 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार 23जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळेच्या पूर्वी सकाळी 8 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
Edited by - Priya Dixit