महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, 4 जानेवारी 2026 रोजी होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्व परीक्षाच्या तारखेत बदल केला असून 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा आता 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या तारखेमुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने घेलेल्या या निर्णयामुळे परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या तयारीला अधिक वेळ मिळाला आहे.
आयोगाने परीक्षेच्या तारखेत बदल केला असला तरी, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. उमेदवारांनी या बदललेल्या तारखेची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.