गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2024 (10:35 IST)

महायुती सरकारची योजना, महाराष्ट्रात दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती होणार

devendra fadnavis
Maharashtra News: महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे दीड लाख बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा महायुती सरकारचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आपल्या सरकारच्या भविष्यातील योजनांचा खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी सुमारे दीड लाख बेरोजगार तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हे आपल्या सरकारचे प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील विविध शासकीय तसेच विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या आवश्यक सूचना शासनाने दिल्या आहे.

Edited By- Dhanashri Naik