बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (21:38 IST)

पृथ्वीराज चव्हाणांना मनोज जरांगेंचं प्रत्यूत्तर

Prithviraj Chavan
मराठा आरक्षणावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वाक्ययुध्द रंगलय. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी घोडं मारलाय का? असा सवाल चव्हाण यांनी केलायं.यावर उत्तर देत असताना मराठा आरक्षण सरकट करावं अशी मागणी केल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलयं.तसंच पृथ्वीराज चव्हाण यांना समजत नाही का असा प्रतिप्रश्न जरांगे यांनी केलायं.
 
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे.जरांगेंची शुगर, पाणीपातळी खालावतेय असं डॉक्टरांनी आज सांगितलं आहे.मात्र तपासणी करून घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे.सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.तब्येत चांगली आहे, मराठा आरक्षणाच्या वेदना महत्त्वाच्या आहेत अस म्हणत सरकारसमोरचं आव्हान अधिक तीव्र करण्याची भूमिका जरांगे यांनी घेत पाणी घेणं बंद केलं आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor