Marathi Biodata Maker

मुंबईतील 6 मार्चचा मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती

सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (10:32 IST)
मुंबईतील 6 मार्चचा नियोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. याच काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे झाले. मुंबईतही 6 मार्चला मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मोर्चा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मराठा मोर्चाच्या विनोद पोखरकर यांनी दिली. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीचा पेपरला सुट्टी देऊन पेपर पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली असता, सरकारने सहकार्य केले नाही, म्हणून तूर्तास मुंबई मोर्चाची तारीख रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती विनोद पोखरकर यांनी दिली. मुंबईमध्ये लवकरच राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असेही विनोद पोखरकर यांनी सांगितले.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: प्रशासनाने आषाढी वारी २०२६ च्या तयारीला वेग दिला

१८२ देशांमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना लक्ज़मबर्ग शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन मजली घराला आग; महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर नऊ जणांना वाचवण्यात यश

महाराष्ट्रात महिला उद्योजकांसाठी विशेष 'स्टार्टअप हब' सुरू झाले; सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलले

परभणी येथील हनुमान मंदिरात मंडपाचे छत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

पुढील लेख
Show comments