1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: उस्मानाबाद , शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)

हुंड्यामुळे विवाहितेची आत्महत्या

married woman
उस्मानाबादेत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तुळजापूर शहरातील प्रिया घोडके नावाच्या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
 
हुंड्यासाठी राहिलेले 1 लाख 60 हजार न दिल्याने सासरची मंडळी प्रियाला त्रास द्यायचे. तिला मारहाण करायचे, अशी माहिती आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 306, 34 नुसार नवरा, सासू , सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.