शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

MHT-CET परीक्षेचा निकाल या तारखेला जाहीर होणार

राज्यातील सामायिक प्रवेश परीक्षेचा (MHT-CET २०२३) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी ही माहिती दिली. 
 
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच मोबाइल ॲपद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत सर्व सूचना आणि माहिती मिळणार आहे.
 
राज्य सामायिक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १९ प्रवेश परीक्षांपैकी १७ परीक्षा घेण्यात आल्या ज्यापैकी १६ परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. एकूण ९ लाख १३ हजार १६ विद्यार्थ्यांनी या परिक्षा दिल्या होत्या. 
 
उर्वरित दोन परीक्षा लवकरच घेण्यात येतील. ज्यापैकी बीएस्सी नर्सिंग-सीईटी २०२३ ही परिक्षा १९ जूनला घेण्यात येणार आहे. ज्यासाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.