1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मार्च 2025 (15:54 IST)

महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मंत्री शंभूराज देसाईंनी दिले अपडेट

Shambhuraj Desai
सपाचे नेते अबू आझमी यांच्या औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्यावर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या विरोधात मोहीम सुरु झाली आहे. आता छत्रपती संभाजी नगर मधली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. आता या प्रकरणात शंभू देसाई यांनी मोठे अपडेट दिले आहे. 
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर मंत्री शंभू देसाई म्हणाले, आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की ,काँग्रेस सरकारच्या काळात पुरातत्व विभागाने या वास्तूला संरक्षण दिले होते. म्हणून या बाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी सल्लासम्मत केल्यांनतर घेतला पाहिजे. तथापि, छत्रपती संभाजी महाराजांना मारणाऱ्या आणि मराठ्यांवर हल्ला करणाऱ्या औरंगजेबाशी संबंधित कोणतेही चिन्ह महाराष्ट्रात राहू नये अशी आमची इच्छा आहे. 
औरंगजेबाची कबर हटवण्याची सगळ्यांची मागणी आहे. परंतु ते कायद्याच्या कक्षेतच केले पाहिजे, कारण काँग्रेस सरकारने ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण(ASI) च्या संरक्षणाखाली दिली आहे. मात्र आता हे सगळे कायद्याच्या कक्षेत राहून केले पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे .  
Edited By - Priya Dixit