गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (08:41 IST)

मविआतील १०-१५ आमदार भाजप-शिंदे गटात प्रवेश करणार : बच्चू कडू

bachhu kadu
महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे काहीही कारण नाही.येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच महाविकास आघाडीतील १०-१५ आमदार भाजप-शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना वरळी आणि त्यानंतर ठाण्यातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकार अतीबहुमतामध्ये आहे.म्हणजेच २०-२५ आमदार इकडे तिकडे झाले तरी,काही फरक पडणार नाही.सरकार आपले कार्यकाळ पूर्ण करेल.सध्या ठाकरे गटात आमदारच राहिले नाही. यामुळे इतर पक्षातील आमदार आमच्याकडे येणार आहेत असेही बच्चू कडू म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor