बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आमदार बच्चू कडू यांचा पुन्हा राडा, जामीन मंजूर

दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला गेले असता. कडू यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केला आहे.
 
कोर्टाने आज आमदार बच्चू कडू यांचा जामिन मंजूर केला आहे. यामध्ये कोर्टाने सांगितले आहे की जो पर्यंत आरोपत्र दाखल करण्यात येते नाही, तो पर्यंत दर शनिवारी पोलिस स्टेशन येथे हजेरी देणे गरजेचे आहे. असे सांगत न्यायलयाने कडू यांचा जामिन मंजूर केला आहे.