Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आगामी एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

Updated: मंगळवार, 10 जानेवारी 2017 (16:54 IST)
 
एमपीएससीतर्फे २१ नोव्हेंबर २0१६ रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात विक्रीकर निरीक्षक- २०१६ या पदाची पूर्वपरीक्षा २९ जानेवारी रोजी, तर मुख्य परीक्षा २८ मे रोजी घेतली जाणार असल्याचे नमूद केले होते; परंतु विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा २८ मेऐवजी ३ जून रोजी घेतली जाईल. त्याचप्रमाणो राज्य उत्पादन शुल्क गट 'क' दुय्यम निरीक्षकपदाची पूर्वपरीक्षा २ जुलै रोजी व मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता या पदाची पूर्व परीक्षा २८ मे रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
 
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ या पदाची पूर्वपरीक्षा ४ जून रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती; परंतु बदललेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी होईल. विक्रीकर निरीक्षक व वन सेवा पदाच्या पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, शासनाकडून निश्‍चित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच वेळापत्रकानुसार पदे जाहीर करून परीक्षा घेतली जाईल असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले

दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठे प्रदर्शन; आरक्षण आणि यूजीसीच्या नियमांविरुद्ध हजारो लोकांचे मोठे आंदोलन

मुंबईत मॅकडोनाल्ड्स आणि रेडिओ क्लबवर एफडीएची कारवाई, परवाने निलंबित

महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रशिक्षण धोरण लागू; मंत्री प्रकाश आबितकर यांची घोषणा

इंग्लंडची क्रिकेटपटू केट क्रॉसने निवृत्ती जाहीर केली, १३ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

पुढील लेख
Show comments