बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी

मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने  ऑनलाइन असेसमेंटसाठी मुंबईतील लॉ, आर्ट्स आणि कॉमर्सच्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची सुट्टी वाढवली आहे. 
 
मुंबई विद्यापीठात ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतला गोंधळ अजूनही सुरूच आहे. निकाल उशिरा लागत असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी कंबर कसली आहे.