शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबईतील अंधेरीच्या मरोळ परिसरातील मैमून या रहिवासी इमारतीला पहाटे दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मोईन कपासी (८०), तस्लीम कपासी (४२),सकीना कपासी (१३) , मोईज कपासी (८) अशी मृतांची नावे आहेत. तर इमारतीमधील अन्य सात रहिवासी या आगीत जखमी झाले आहेत.
 
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग लागल्यानंतर कपासी कुटुंबीयांपैकी एकजण घरातून बाहेर पळाला. यावेळी घराचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य घरातच अडकून पडले. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर हे सर्वजण घराच्या खिडकीपाशी आले. येथून ते तब्बल अर्धा तास मदतीसाठी आक्रोश करत होते. मात्र, खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीमुळे नागरिकांना त्यांना मदत करता आली नाही आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.