गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (17:14 IST)

मुंबईतील भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटला

mumbai mahapalika election
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 192 जागा, आरपीआय 25, रासप 5 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार आहे. भाजपने 192 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या 34 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी रहावे लागले आहे.