suvichar

मुंबई: जुलैत म्हाडाची 800 घरांसाठी जाहिरात

मुंबईतल्या म्हाडाच्या सुमारे 800 घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असून, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे.
 
दरवर्षी 31 मे रोजी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्याचा पायंडा आहे. यंदा मे उलटून गेला तरी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक जण यंदा लॉटरी नसेल असे कयास बांधूनही मोकळे झाले. मात्र यंदा उशीर झाला असला तरीही लवकरच लॉटरीची जाहिरात देऊ, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यंदा पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड आदी भागातील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र तरीही जुलै महिन्यातच म्हाडा घरांची यादी प्रसिद्ध करेल, असे म्हाडानं सांगितलं आहे. मुंबईत परवडणारं घरं घेणं प्रत्येक व्यक्तीला सहज शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहावी लागते. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

उद्धव ठाकरे १८ जुलै रोजी नागपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार; हिंदूंना जागृत करणार -संजय राऊत

परदेशात बसून सोशल मीडियावर माहिती शोधत आहेत, टीईटी पेपरफुटीवर राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

लाडकी बहिण योजना' अंतर्गत ३५०० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला संजय राऊतांचा दावा

राहुल गांधी यांनी टीईटी पेपरफुटीवरून महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला

LIVE: टीईटी पेपरफुटीवर राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments