शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पाण्याची पातळी वाढल्याने पेट्रोल पंप व हॉटेलात अडकले शंभराहून अधिक नागरिक

मुंबई सोबत महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले असून, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातल्याचे दिसून येते आहे, तर उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. 
 
मुंबईसह नवी मुंबईतील सततच्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी पाणीच झाले आहे. याचा मोठा फटका कल्याणजवळील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला असून,  या ठिकाणी 100 लोक अडकले आहेत. तर त्याच्या बाजूलाच असलेल्या दोन हॉटेलमध्येही काही जण अडकले आहेत. तसेच अनेक चारचाकी गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत. या ठिकाणच्या रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. मात्र या ठिकाणी दोन हेलिकॉप्टर आणि बचाव बोटी पोहोचल्या असून मदत कार्य जोरात सुरु आहे.
 
पिकनिकसाठी रिसोर्टला गेलेले 40 लोक अडकले
तर दुसरीकडे अंबरनाथच्या शांतीसागर रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी गेलेले 40 लोक अडकले आहे. या ठिकाणी अडकलेल्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी हाक दिली आहे.