रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

रोबोटने केले मुंबईतील प्रथम किडनी ट्रान्सप्लांट

मुंबई- रोबोटिक प्रक्रियेद्वारे किडनी ट्रान्सप्लांट केले गेलेले अंधेरीतील 59 वर्षीय सी. एन. मुरलीधरन हे शहरातील पहिले रूग्ण ठरले आहेत. रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांटमुळे आपल्याला जास्त वेदना झाल्या नसल्याचे अतिशय कमी वेळात बरे झालेले मुरलीधरन सांगतात. मुरलीधरन यांची किडनी निकामी झाल्यामुळे ते मागील एक वर्षापासून डायलिसिसवर होते. अखेर त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतला. त्यांच्या 55 वर्षीय पत्नी लीना यांची किडनी मुरलीधरन यांच्या किडनीशी जुळणारी असल्याने त्यांनी आपल्या पतीला किडनी देण्याचे ठरविले. त्यानुसार, आवश्यक चाचण्या करून चर्नीरोड येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्राद्वारे त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट केले गेले.
 
हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट हॉर्किसोडास हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमसह यशस्वीरित्या करणारे अमेरिकेतील रोबोटिक युरोलॉजी सर्जन डॉ. इंदरबिर गिल सांगतात की रोबोटिक तंत्राचा सर्वात मोठा फायदा हा आहे की शस्त्रक्रियेसाठी रूग्णाच्या स्नायूंची जास्त चिरफाड करावी लागत नाही, त्यामुळे शरीरातील रक्त कमी प्रमाणात वाया जाते आणि वेदनाही कमी होतात. रूग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरीही परततो.