शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:34 IST)

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा घोळ कायम

mumbai vidyapith

मुंबई विद्यापीठाच्या लागलेल्या निकालात विद्यापीठाने फक्त उत्तरपत्रिकांच्या पुरवणी तपासूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका वगळून केवळ पुरवणी तपासून तेच गुण त्यांना दिल्याची तक्रार अनेक महाविद्यालयांनीच विद्यापीठाकडे केली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना केवळ 15 ते 20 गुण मिळाल्याने त्यांच्या नावापुढे नापास शेरा पडला आहे.

हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्याचं समोर आलं. निकाल लावण्यासाठी घाईघाईने केलेल्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी कॉलेज प्राचार्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.