शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2017 (08:53 IST)

निर्घृण हत्या : पती-पत्नीसह मुलीला खड्ड्यात पुरले

पुण्यातील खेड तालुक्यातल्या कुरकुंडीमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करुन तिघांचे मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आले आहेत. 45 वर्षीय रोहिदास बाळू गोगावले, 40 वर्षीय मंदा रोहिदास गोगावले आणि 12 वर्षीय अंकिता गोगावले यांचे मृतदेह सापडले आहेत.एकाच कुटुंबातील तिघा जणांच्या झालेल्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन हत्येचा तपास सुरु केला आहे.