मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मार्च 2025 (17:05 IST)

MVA फडणवीस सरकारविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणणार

jayant patil
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मंगळवारी धनंजयमुंडे यांनी राजीनामा दिल्याने विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगितले की, महाविकास आघाडी महाराष्ट्र सरकार विरुद्ध विषेधाधिकार प्रस्ताव आणणार आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती विधानसभेला दिली नाही. 
मंगळवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आणि तो स्वीकारल्याचे सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, हे सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आधी सभागृहात द्यायला हवी होती. आम्ही विशेषाधिकार प्रस्ताव आणू. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (सपा), काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (युबीटी ) यांचा समावेश आहे.
Edited By - Priya Dixit