सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (08:18 IST)

नागपूर: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार

rape
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून जंगलात कारमध्ये कोंबून दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना सावनेरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अखिल महाविर भोंगे (२६, रा. पंदराखेडी, ता. सावनेर) आणि पवन विठ्ठलराव बासकवरे (२४, मानेगाव, ता. सावनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी(काल्पनिक नाव) ही सावनेरमधील एका विद्यालयात दहावीत शिकते. तिच्या वर्गमैत्रिणीचा आरोपी अखिल भोंगे हा प्रियकर होता. पवन बासकवरे त्याचा मित्र होता. २३ जानेवारीला सायंकाळी पवन आणि अखिल हे दोघेही स्वीटीला शाळेत भेटायला आले. स्विटीला कारमध्ये बसवून पवन आणि अखिलेशने कार नागपूर महामार्गाने घेतली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor