सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (07:38 IST)

नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’सुरू केले

maharashtra police
काही कालावधीपासून नागपुरात अंमली पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण पिढी व विद्यार्थी गुन्हेगारांकडून ‘टार्गेट’ करण्यात येतात. हीच बाब लक्षात घेऊन नागपूरपोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’ सुरू केले आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी शाळा महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या आत असलेल्या साडेतीनशे पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. तर अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अगोदर अडकलेल्या ३७३ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.
 
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. शाळा महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ व अंमली पदार्थांची विक्री करण्यास परवानगी नाही. मात्र अनेक ठिकाणी नियमांचा भंग करत पानठेले थाटण्यात आले आहेत. यातील काही पानठेले तसेच रेस्टॉरेन्ट्स, कॅफे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री होते. यावर वचक बसावा यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पानठेल्यांसोबतच रेस्टॉरेन्ट्स व कॅफेचीदेखील तपासणी होणार आहे. ‘कोपटा’ नियमानुसार १०० मीटरच्या आत असलेल्या पानठेला चालकांना दंड ठोठावण्यात आला. जर या पानठेल्यांमध्ये अंमली पदार्थ आढळले तर त्याला कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor