शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (11:00 IST)

महिला चालकला चाचणीत नापास केल्याने नागपूर आरटीओ अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Nagpur Rural RTO Assistant Inspector receives death threat
Nagpur News: ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी देण्यासाठी आलेल्या महिलेला नापास केल्याने एकाने नागपूर ग्रामीण आरटीओच्या सहाय्यक निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कामात अडथळे निर्माण करून खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी आरटीओ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून कपिलनगर पोलिसांनी राठोड ले-आऊट येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा व्यक्ती आपल्या पत्नीच्या नावाने झारा ड्रायव्हिंग स्कूल चालवतो. ड्रायव्हिंग लायसन्स अर्जावर त्याच्या ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का मारतो आणि चाचणीसाठी पाठवतो. आरटीओ अधिकारी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, हा व्यक्ती  उमेदवारांवर त्याच्या ड्रायव्हिंग स्कूलने शिक्का मारलेले अर्ज न तपासता पास करण्यासाठी दबाव टाकतो. शहरातील तिन्ही आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना तो धमक्या देतो. तसेच मंगळवारी त्यांनी एका महिला उमेदवाराला चाचणीसाठी पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयाचे अधिकारी  यांनी नियमांचे पालन न केल्याने त्यांना नापास केले. यामुळे निराश होऊन या व्यक्तीने मित्रांसह ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर पोहोचला. आरटीओ अधिकारी यांना शिवीगाळ करून पत्नीचे नाव पुढे करून खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊ लागला. तसेच ट्रॅकवर सुरू असलेल्या चाचणीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
 
यानंतर आरटीओ कार्यालयाचे अधिकारी यांनी कपिल नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या व्यक्तीरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.